केरळात काही लोक निपा विषाणूंमुळे दगावल्यानंतर आता या विषाणूचा फैलाव कर्नाटकात पोचल्याचे वृत्त आहे. कर्नाटकात निपाचे दोन रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. केरळात निपामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथे निपाचे रुग्ण आढळल्याचा संशय आहे. एक २० वर्षीय महिला व एक ७५ वर्षीय वृद्धा असे हे रुग्ण आहेत. ती दोघेही काही दिवसांपूर्वीच केरळहून तेथे आली आहेत. मात्र त्यांना निपाची लागण झाल्याचे निश्चित निदान जाहीर झालेले नाही.