कर्नाटकचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून अनुक्रमे जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी व कॉंग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष जी. परमेश्वर आज शपथबध्द होणार आहेत. दरम्यान काल कर्नाटक मंत्रिमंडळ रचनेविषयी उभय नेत्यांची बैठक होऊन त्यात एकूण ३४ पैकी सर्वाधिक २२ मंत्रिपदे कॉंग्रेसला देण्याचा निर्णय झाला. तसेच सभापतीपद व उपमुख्यमंत्रीपदही कॉंग्रेसलाच देण्यात आले.
कॉंग्रेसचे के. आर. रमेशकुमार यांना विधानसभा सभापतीपद देण्याचा निर्णय झाला आहे. कॉंग्रेसचे कर्नाटक प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांनी वरील माहिती पत्रकारांना दिली. जेडीएसच्या वाट्याला १२ मंत्रिपदे आली आहेत. विधानसभेत बहुमत सिध्द केल्यानंतर खात्यांचे वाटप होणार असल्याचे सांगण्यात आले.
आजच्या शपथविधी सोहळ्याला राहुल व सोनिया गांधी यांच्यासह मायावती, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, सीताराम येच्युरी आदी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.