
>> सनरायझर्स हैदराबादवर २ गड्यांनी मात
दक्षिण आफ्रिकन खेळाडू फाफ डु प्लेसिसच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने क्वॉलिफायर-१ लढतीत सनरायझर्स हैदराबाद संघावर २ गडी राखून मात करीत इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पराभवामुळे सनरायझर्स हैदराबादला क्वॉलिफायर-२मध्ये हैदराबादला कोलकाता विरुद्ध राजस्थान यांच्यातील विजेत्याशी आपले नशिब आजमावे लागेल.
सनरायझर्स हैदाराबादकडून मिळालेले १४० धावांचे विजयी लक्ष्य चेन्नई सुपर किंग्ज संघाने शेवटच्या षट्काच्या पहिल्या चेंडूवर गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर शेन वॉटसन आपले खाते न खोलताच भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर श्रीवत्स गोस्वामीकडे झेल देऊन परतला.
डावखुरा फलंदाज सुरेश रैना २२ धावा जोडून सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. कौलने आणखी एक झटका देताना बहरात असलेल्या अंबाती रायडूला खाते खोलण्यापूर्वीच परतीची वाट दाखविली. त्यानंतर रशिद खान आणि संदीप शर्मा यांनी चेन्नईला झटपट धक्के दिल्याने त्यांची स्थिती एकवेळ १७.५ षट्कांत ८ बाद ११३ अशी अशी बिकट झाली होती. परंतु फाफ डु प्लेसिसने ५ चौकार व ४ षट्कारांच्या सहाय्याने ४२ चेंडूत नाबाद ६७ धावांची विस्फोटक खेळी करीत संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. शार्दुल ठाकुरने महत्त्वपूर्ण नाबाद १५ धावा जोडल्या. हैदराबादतर्फे संदीप शर्मा, शार्दुल ठाकुर व रशिद खान यांनी प्रत्येकी २ तर भुवनेश्वर कुमारने १ गडी बाद केला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ गड्यांच्या मोबदल्यात १३९ अशी धावसंख्या उभारता आली होती. तळाचा फलंदाज कार्लोस ब्रेथवेटने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. कर्णधार केन विल्यमसन व युसुफ पठाण यांनी प्रत्येकी २४ धावा तर श्रीवत्स गोस्वामी व शाकिब अल हसनने प्रत्येकी १२ धावां जोडल्या. सलामीवीर शिखर धवन आपले खातेही न खोलता तंबूत परतला. चेन्नईच्या ड्वेन ब्राव्हाने २ तर दीपक चहर, लुंगी एन्गिडी, शार्दुल ठाकुर व रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः शिखर धवन त्रिफळाचित गो. दीपक चहर ०, श्रीवत्स गोस्वामी झे. व गो. लुंगी एन्गिडी १२, केन विल्यम्सन झे. महेंद्रसिंह धोनी गो. शार्दुल ठाकुर २४, मनीष पांडे झे. व गो. रविंद्र जडेजा ८, शाकीब अल हसन झे. महेंद्रसिंह धोनी गो. ड्वेन ब्राव्हो १२, युसुफ पठाण झे. व गो. ड्वेन ब्राव्हो २४, कार्लोस ब्रेथवेट नाबाद ४३, भुवनेश्वर कुमार धावचित (महेंद्रसिंह धोनी).
अवांतर ः ९. एकूण २० षट्कांत ७ बाद १३९ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-० (शिखर धवन ०.१), २-३४ (श्रीवत्स गोस्वामी ३.५), ३-३६ (केन विल्यम्सन ४.२), ४-५० (शाकीब अल हसन ६.४), ५-६९ (मनीष पांडे ११.३), ६-८८ (युसुफ पठाण १५), ७-१३९ (भुवनेश्वर कुमार २०)
गोलंदाजी ः दीपक चहर/४/०/३१/१, लुंगी एन्गिडी ४, शार्दुल ठाकूर ४/०/५०/१, ड्वेन ब्राव्हो ४/०/२५/२, रविंद्र जाडेजा ४/०/१३/१.
चेन्नई सुपर किंग्ज ः शेन वॉटसन झे. श्रीवत्स गोस्वामी गो. भुवनेश्वर कुमार ०, फाफ डुप्लेसी नाबाद ६७, सुरेश रैना त्रिफळाचित गो. सिद्धार्थ कौल, अंबाती रायुडू त्रिफळाचित गो. सिद्धार्थ कौल ०, महेंद्रसिंह धोनी त्रिफळाचित गो. रशिद खान ९, ड्वेन ब्राव्हो झे. शिखर धवन गो. रशिद खान ७, रविंद्र जाडेजा झे. व गो. संदीप शर्मा ३, दीपक चहर झे. कार्लोस ब्रेथवेट गो. संदीप शर्मा १०, हरभजन सिंग धावचित (रशिद खान) २, शार्दुल ठाकूर नाबाद १५.
अवांतर ः ५. एकूण १९.१ षट्कांत ८ बाद १४० धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-० (शेन वॉटसन ०.५), २-२४ (सुरेश रैना ३.३), ३-२४ (अंबाती रायुडू ३.४), ४-३९ (महेंद्रसिंह धोनी ७.४), ५-५७ (ड्वेन ब्राव्हो ११.२), ६-६२ (रविंद्र जाडेजा १२.३), ७-९२ (दीपक चहर १५), ९-११३ (हरभजन सिंग १७.५)
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार ३.१/०/१४/१ संदीप शर्मा ३/०/३०/२, सिद्धार्थ कौल ४/०/३२/२, कार्लोस ब्रेथवेट ३/०/३१/०, रशिद खान ४/०/११/२, शाकीब अल हसन २/०/२०/०.