महिलांच्या प्रदर्शनीय टी-२०त सुपरनोवासची बाजी

0
107

रोमहर्षक झालेल्या ऐतिहासिक महिलांच्या टी-२० क्रिकेट आयपीएल प्रदर्शनीय सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील सुपरनोवास संघाने बाजी मारताना सृती मंधानाच्या टे्रलब्लेझर्स संघावर ३ गडी राखून मात केली. ट्रेलब्लेझर्सकडून मिळालेले १३० धावांचे लक्ष्य सुपरनोवासने २०व्या षट्‌काच्या शेेवटच्या चेंडूवर गाठले.
सनरायझर्स हैदाराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील क्वॉलिफायर-१ सामन्यापूर्वी ही लढत खेळविण्यात आली.

ट्रेलब्लिझर्सकडून मिळालेल्या १३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुपरनोवास संघाला शेवटच्या षट्‌कांत केवळ ४ धावांची आवश्यकता होती. परंतु न्यूझीलंडची गोलंदाज सुझी बॅटीसने पहिल्या तीन चेंडूत केवळ१ धाव देत सामन्यांत रंगत आणली होती. परंतु शेवटच्या तीन चेंडूंवर तीन धावा घेत सुपरनोवासने ही लढत ३ गडी राखत जिंकली. पूजा वस्त्राकरने मिडविकेटला चेंडू टोलवत १ धावा घेत संघाचा विजय साकारला. मिथाली राजने २२, डॅनिल व्हॉटने २४, मेग लेनिंग १६, कर्णधार हरमनप्रीत कौर २१, सोफी डीवायन १९, वेदा कृष्णमूर्ती २, मोना मेश्रामने ४ धावा जोडल्या. एलिसी पेरी (१३) व पूजा वस्त्राकर (२) नाबाद राहिल्या. ट्रेलब्लेझर्सतर्फे पूनम यादव व सुझी बेट्‌स यांनी प्रत्येकी २ तर झुलन गोस्वामी व एकता बिष्ट यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ट्रेलब्लेझर्स संघाने ६ गडी गमावत १२९ अशी धावसंख्या उभारली होती. सुझी बेट्‌सने सर्वाधिक ३२ धावांचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिगीजने २५, दीप्ती शर्माने २१ स्मृती मंधाना व शिखा पांडेने प्रत्येकी १४, एलिसा हेली ७ तर डॅनिएल हेजलने ४ धावा जोडल्या. सुपरनोवासतर्फे मेगन शट व एलिसे पेरीने प्रत्येकी २ तर अनुजा पाटील व राजेश्वरी गायकवाडने प्रत्येकी १ गडी बाद केला.
बीसीसीआय महिला टी-२० लीगची सुरुवात करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी प्रयोग म्हणून या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन केले होते.