महिला हॉकी संघाचा चीनवर विजय

0
114

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आपला दमदार फॉर्म कायम राखताना भारताच्या महिला संघाने क्रमवारीत आपल्यापेक्षा वरच्या स्थानी असलेल्या चीनवर काल ३-१ असा विजय मिळविला. भारताकडून वंदना कटारिया (चौथे व ११वे मिनिट) हिने दोन तर गुरजीत कौरने एक गोल केला. चीनचा एकमेव गोल वेन डान हिने १५व्या मिनिटाला नोंदविला. जागतिक क्रमवारीत भारतीय संघ दहाव्या तर चीनचा संघ आठव्या स्थानी आहे. भारताचा पुढील सामना आज मलेशियाशी होणार आहे. आजच्या अन्य एका सामन्यात मलेशियाने जपानवर ३-२ असा विजय साकार केला. भारताने आपल्या पहिल्या लढतीत जपानचा ४-१ असा फडशा पाडला होता.