उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकार्यांनी श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालीक यांच्या प्रवेशावरील बंदी आणखीन ६० दिवसांनी वाढविली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी मागील काही वर्षांपासून श्रीराम सेनेचे प्रमुख मुतालीक यांच्या प्रवेशावर बंदी घातलेली आहे. दर दोन महिन्यांनी या बंदीमध्ये वाढ केली जात आहे. ही प्रवेशबंदी १५ मे २०१८ पासून लागू होणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.