भाजपकडून म्हादई प्रश्‍नाचा राजकीय स्वार्थासाठी वापर

0
97

>> कॉंग्रेसचा आरोप

भाजपने म्हादई प्रश्‍न खासगी मालमत्ता केला आहे. भाजपने म्हादईचा विषय राजकीय स्वार्थासाठी वापरला आहे. म्हादईचा विषय घेऊन जनतेच्या भावनांशी भाजप खेळत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांनी पत्रकार परिषदेत काल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हादईच्या प्रश्‍नावर कर्नाटक निवडणुकीत वक्तव्ये केली होती. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात म्हादई प्रश्‍नावर भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांनी म्हादई पाणी प्रश्‍नावर मौन पाळले. भाजपला गोव्याच्या हिताचे सोयरसुतक नाही. भाजप केवळ सत्ता मिळविण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो, अशी टीका त्यांनी केली.