>> सिंधू, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात
भारताची फुलराणी तथा दोन वेळची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती शटलर सायना नेहवालने वुहानमध्ये सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. परंतु ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि अव्वल मानांकित किदाम्बी श्रीकांत यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
माजी जागतिक नंबर १ खेळाडू सायनाने कोरियाच्या ली जंग मि हिच्यावर सरळ गेमध्ये मात केली. सायनाने ही लढत २१-१५ व २१-१३ अशी ४३ मिनिटांत जिंकली. आता उपांत्य फेरीत तिची गाठ चायनीज तायपैच्या ताइ त्झु यिंग किंवा चीनच्या आठव्या मानांकित हे बिंगजिआओ यांच्यातील विजेत्याशी पडेल.
दरम्यान, ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला कोरियाच्या सातव्या मानांकित संग जि ह्युन हिच्याकडून १९-२१, १०-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. तर श्रीकांतला पुन्हा एकदा मलेशियाचा स्टार खेळाडू ली चोंग वेईने १२-२१, १५-२१ असे पराभूत केल्याने या दोन्ही भारतीय शटलर्सचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.