गोवा स्टार्टअप परिषद आजपासून

0
83

केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते गोवा स्टार्टअप धोरण आणि गोवा स्टॉर्टअप वेबसाइटचे अनावरण २८ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. यानिमित्त आयटी क्षेत्रासंबंधी दोन दिवसीय आयटी क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन व चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. स्टार्ट अप परिषद आज सुरू होणार आहे. यावेळी उद्योगपती श्रीनिवास धेंपो, मोहनदास पै, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. राज्य सरकारकडून स्टॉर्टअप संस्कृतीचा विकास, उद्योगांना साधन सुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य दिले जात आहे. २७ व २८ रोजी होणार्‍या कार्यक्रमात आयटी क्षेत्रातील मान्यवर सहभागी घेणार आहेत. स्टॉर्टअप उद्योगासाठी साधन सुविधा, नवीन योजनांची घोषणा या कार्यक्रमात केली जाणार आहे. राज्य आयटी उद्योगासाठी योग्य वातावरण निर्माण करून प्रोत्साहन दिले जाणार आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.