
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट शहरात २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेस दिमाखदार सोहळ्याने प्रारंभ झाला. कॅरारा स्टेडियमवर हा रंगतदार उद्घाटन सोहळा पार पडला. नेत्रदीपक असा हा सोहळा ठरला.
या उद्घाटन सोहळ्यात गायन, संगीताच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाची कला, आणि पुरातन संस्कृतीची नेत्रदीपक झलक दाखवण्यात आली. या सोहळ्यातील रंगतदार कार्यक्रमांनी संपूर्ण जगताला मंत्रमुग्ध केले. या उद्घाटन सोहळ्यात ब्रिटनचा प्रिन्स चार्ल्सने ब्रिटनच्या महाराणीतर्फे राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ झाल्याची घोषणा केली.
रंगतदार उद्घाट सोहळ्यात सुमारे ४००० कलाकांनी कॅरारा स्टेडियममध्ये उपस्थित ३५ हजार प्रेक्षकांना संमोहित केले. उद्घाटन सोहळ्यात पृथ्वीच्या झगमगटानंतर स्टेयिडममध्ये निळ्या रंगाच्या रोषणाईत आदिवासी वेषभूषा परिधान केलेल्या कलाकारांनी ऑस्ट्रेलियाचा इतिहास जगासमोर ठेवला. सेई बाई द्वीपावरील ईगल डान्स तर डोळ्यांचे पारणेच फेडले. स्टेडियमच्या मध्ये तयार केलेला समुद्रकिनारा आणि त्यावर थ्री डी इफेक्ट्सने दाखविण्यात आलेल्या समुद्राच्या लाटांमुळे प्रेक्षकांना खर्या समुद्रकिनार्यावर पोहोचवले होते.
याच दरम्यान,बीचवरच गायिका रिकी ली कॉल्टरने आपले ‘टेक्निकलर लव्ह’ गीतसादर केले. त्यावर बीचवरील कलाकारांनी अप्रतिम नृत्य सादर केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल, ब्रिटेनचे प्रिन्स चार्ल आणि त्यांची पत्नी कॅमिला आणि गोल्ट कोस्ट राष्ट्रकुल खेळाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष पीटर बीएटी व्यासपीठार पोहोचले.
त्यानंतर ऑस्ट्रलियाची माजी ऍथलिट सुसी ओनील हिने राष्ट्रकुल खेळाच्या ज्योतीसह स्टेडियममध्ये प्रवेश केला. ही ज्योत ७१ देशांची सफर करून पुन्हा गोल्ड कोस्टमध्ये पोहोचली आहे. त्यानंतर स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध देशांच्या दलांनी आपल्या ध्वजांसह संचलन केले.
भारतीय पथकाचे नेतृत्व स्टार बॅडमिंटनपटू तथा ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या पी.व्हीे. सिंधूने केले. प्रथमच भारताच्या पुरुष आणि महिाा खेळाडूंनी ट्रावजसर्र् आणि ब्लेझर्स परिधान केला होता. यापूर्वी भारतीय महिला उदघाटन सोहळ्यात साडी आणि ब्लेझरमध्ये संचलनात उतरत होती. तर पुरुष खेळाडू ब्लेझर्ससह फेटा बांधत होते. परंतु प्रथम भारतीय दल वेगळा दिसून आला. भारताकडून २२५ खेळाडूंचे पथक सहभागी झाले आहे. अधिकतर देशांचे खेळाडू आपाल्या देशांच्या पारंपरिक वेषभूषेत संचालनात सहभागी झाले होते.
आयोजन समितीचे अध्यक्ष पीटर बीएटीने स्वागतपर भाषण केले. प्रिन्स चार्ल्स यांनी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु झाल्याची औपोचारिक घोषणा करताचा आसमंत सप्तरंगी रोषणाईने उजळून गेला.
७१ देशांचे ४,५०० हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. राष्ट्रकुलमध्ये २३ क्रीडा प्रकारात एकूण २७५ सुवर्णपदके पटकावण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरस असेल. ११ दिवस ही राष्ट्रकुल स्पर्धा चालणार आहे. ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. गोल्ड कोस्ट व्हिलेजमध्ये खेळाडूंची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धा नसताना मोकळया वेळात खेळाडूंना मन रमवता यावे यासाठी व्हर्च्युअल कॉम्प्युटर गेम्स, जलतरण तलाव, कृत्रिम धबधबे, पियानोची व्यवस्था करण्यात आली आहे.