जम्मू-काश्मिरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी गावात राज्य पोलीस व सुरक्षा दलांनी काल केलेल्या संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. जम्मू-काश्मिरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी ही माहिती दिली.
गावाच्या सीमेवरील जंगल भागात दहशतवादी दडून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या परिसराला सुरक्षा दले व पोलिसांनी वेढा घातला होता. त्यानंतर जंगल भागातून दहशतवादी पोलिसांवर गोळीबार करीत होते. त्यानंतर सुरक्षा दले, लष्कर व पोलीस यांनी सर्व बाजूंनी हल्ला चढवीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवले. हे दहशतवादी या भागात गेल्या चार दिवसांपूर्वी घुसले होते असे सांगण्यात आले.