खाण समस्येवर लवकरच तोडगा

0
231

>> खासदार सावईकरांची माहिती

राज्यातील खाण समस्येवर आठवडाभरात तोडगा काढण्यात येणार असल्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. त्यासाठी ऍटर्नी जनरलकडून सल्ला घेण्यात येणार आहे. या समस्येवर कायदेशीर कोणता तोडगा काढणे शक्य आहे याबाबत ऍटर्नी जनरलशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले.

गेल्या २० मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गोव्यात आले असता त्यांनी खाण अवलंबितांसह विविध घटकांशी खाणप्रश्‍नी चर्चा केली होती. त्यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी विविध घटकांनी त्यांनी विविध सूचना केल्या होत्या. त्याबाबतचे पुढील काम सरकारने यापूर्वीच हाती घेतले आहे. गोवा सरकार तसेच केंद्र सरकारने खाण मुद्दा गंभीरपणे घेतला असून तोडगा काढण्याचे काम आठवडाभरात होणार आहे, असे सावईकर यांनी यावेळी स्पष्ट केले.