इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रेंचायझी असलेल्या राजस्थान रॉयल्सने स्पर्धेच्या अकराव्या मोसमापूर्वी महत्त्वपूर्ण निर्णय घेताना ऑस्ट्रेलियाच्या स्टीवन स्मिथ याला कर्णधारपदावरून हटवताना भारताच्या अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपविले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या कसोटीत कॅमेरून बॅन्क्रॉफ्टला चेंडूशी छेडछाड सांगितल्यानंतर स्टीवन स्मिथ याला काल ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. खेळ हा खेळाडूपेक्षा नेहमीच मोठा असतो, असे राजस्थान रॉयल्सतर्फे संघमालक मनोज बदाले यांनी ट्विट केले आहे.