कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांमध्ये चुरस

0
95

गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी चार-पाच माजी मुख्यमंत्र्यांच्या नावांची चर्चा असली तरी खरी लढत आमदार मुख्यमंत्री दिगंबर कामत व अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव गिरीश चोडणकर यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राप्त माहितीनुसार कॉंग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी अध्यक्षपदासाठी तीन संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली असून ती राहुल गांधी यांना ते सादर करणार आहेत. बहुतेक आमदारांचा दिगंबर कामत यांना पाठिंबा असल्याचे सूत्रांनी सांगितले.