शांताराम नाईक यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

0
97

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र आपण पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवून दिले असल्याचे नाईक यांनी काल सांगितले. हल्लीच झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या परिषदेत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आता मागे राहून युवा नेत्यांना पुढे येण्यास संधी द्यायला हवी, असे आवाहन केले होते. त्यांनी केलेल्या या आवाहनाने आपण प्रभावीत झालेलो असून त्यामुळेच आपण प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे श्री. नाईक म्हणाले. आपण वयाची ७२ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या सूचनेला मान देऊन आपण निवृत्त होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.