लाठीहल्ल्याचा कॉंग्रेसकडून निषेध

0
111

कॉंग्रेस पक्षाने खाण अवलंबितांवरील लाठीहल्ल्याचा निषेध केला आहे. राज्यातील खाण बंदीच्या विरोधात निदर्शने करणार्‍या खाण अवलंबितांनी दोन्ही मांडवी पुलावरील वाहतूक रोखली होती. खाण बंदीच्या विरोधात निदर्शने करणार्‍यांवर लाठीहल्ला अन्यायकारक आहे, असे गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, माजी खासदार शांताराम नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

आंदोलकांवरील लाठीहल्ल्याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे. पोलिसांना आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचा आदेश कुणी दिला? अशी विचारणा प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी केली आहे. पोलिसांना लाठीहल्ला करताना मंत्रिमंडळ सल्लागार समितीची मान्यता घेतली होती का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

कॉँग्रेस विधिमंडळ गटाची आज बैठक
दरम्यान, कॉंग्रेस विधिमंडळ गटाची तातडीची बैठक मंगळवार २० रोजी संध्याकाळी ३.३० वाजता पर्वरी येथे विरोधी पक्ष नेत्यांच्या चेंबरमध्ये बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आंदोलन करणार्‍या खाण अवलंबितांवर करण्यात आलेला लाठीहल्ला, सरकारला खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात आलेले अपयश या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. खाण अवलंबितांच्या आंदोलनाला सरकार जबाबदार आहे, असा दावा विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी केला आहे.