बेती स्पोटर्स क्लबने रुद्रेश्वर युवक संघावर १ धावेने मात करीत गोवा क्रिकेट संघटना आयोजित तिसवाडी ब विभाग क्रिकेट स्पर्धेत थरारक विजय नोंदविला. कांपाल-पणजी येथील सागच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेती स्पोटर्स क्लबने रवी सहानीच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर सर्व गडी गमावत १८४ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात खेळताना रुद्रेश्वर युवक संघाचा डाव १८३ धावांवर संपुष्टात आल्याने त्यांना विजयासाठी केवळ २ धावा कमी पडल्या. सलामीवीर अभिषेक सावंतची ७९ धावांची अर्धशतकी खेळी वाया गेली. संक्षिप्त धावफलक ः बेती स्पोटर्स क्लब, ३३.१ षट्कांत सर्वबाद १८४, (निशिकांत भोसले १३, रवी सहानी ५५, निलेश भोसले २७, संजय सिग्नापुरकर २३, दीपक मेस्त्री १९ धावा. आनंद माजाळीकर ४-२५, सर्व्हेश शिरोडकर २-३१, स्वितेश वेरेकर २-३५, सूर्या दिवकर व सागर सावंत प्रत्येकी १ बळी) विजयी वि. रुद्रेश्वर युवक संघ, ३५.२ षट्कांत सर्वबाद १८३, अभिषेक सावंत ७९, प्रकाश सावंत २३, अजय पासवान १६, स्वितेश वेर्णेकर १४, सागर सावंत १२, सूर्या दिवकर १२ धावा. निशिकांत भोसले २-३१, निलेश भोसले २-३०, संजय सिग्नापुरकर २-३९, संजू कदम व रवी सहानी प्रत्येकी १ बळी).