राज्यातील खाण बंदीमुळे २ लाख लोक उपाशी पडणार असून सरकारने खाणी सुरूच ठेवाव्यात व पुढील प्रक्रिया चालू ठेवावी. खाणी सरकारने चालवाव्यात व या प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा असा सूर खाण अवलंबितांनी डिचोली येथील जाहीर सभेत व्यक्त केली.
यावेळी ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष निळकंठ गावस, डिचोलीचे नगराध्यक्ष राजाराम गांवकर, सुभाष किनळकर, संदिप परब, निलेश कारसेरकर, सुरेश देसाई, यशवंत देसाई यांनी आपल्या भाषणातून खाण बंदीमुळे निर्माण होणार्या समस्यांबाबत जागृती केली.
४० ही आमदारांनी राजीनामे द्यावेत
निळंकठ गावस यांनी सरकारने खाण बंदी न करता त्या चालूच ठेवाव्यात व प्रक्रिया चालू ठेवावी असे सांगितले. तसेच या समस्येवर तोडगा काढण्यात अपयश आल्यास सर्व ४० ही आमदारांनी राजीनामे द्यावेत, असे ते म्हणाले.
१.४४ लाख कोटींच्या मालाचे उत्खनन
६ फेब्रुवारी १५ मार्च काढण्यात खाणवाल्यांनी १ लाख ४४ हजार कोटींचा माल काढलेला असून खाणी सुरू होत नसतील तर ३५ हजार कोटी रुपये खाण अवलंबित जनतेला वाटून द्यावेत अशी मागणी गावस यांनी केली आहे.
खाण अवलंबितांचा सोमवारी महामोर्चा
खाण बंदीमुळे खाण अवलंबितांच्या होंडा येथील बैठकीत सरकारविरोधात नाराजी पहावयास मिळाली. खाण बंदी उठविण्यासाठी दिनांक १९ रोजी पणजीत धडक मोर्चा नेण्याचा निर्णय बैठकीत घेतला. बैठकीला साखळी नगराध्यक्ष धर्मेश सागलानी, अखिल गोवा ट्रक संघटनेचे निळकंठ गावस, सगुण वाडकर, देवानंद परब, महेश गावस, सुरेश देसाई, शिवदास माडकर यांची उपस्थिती होती. निळकंठ गावस म्हणाले की गोव्यातील सर्वसामान्य व्यक्ती खाणीवर विसंबून आहे. सरकारने खाण अवलंबिताना संकटात टाकले. १९ रोजी होणार्या महामोर्चाची रुपरेषा आज होईल.