>> मुफ्तींची राजनाथना विनंती
काश्मीरात सुरक्षा दलांवर दगडफेक करणार्यांना सामील असल्याच्या आरोपावरून गेल्या वर्षीपासून एनआयएच्या अटकेत असलेल्या युवा छायापत्रकार काम्रान युसूफ याच्या सुटकेसंदर्भात हस्तक्षेप करावा अशी विनंती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना केली आहे.
काम्रान युसूफ (वय २०) या युवा छायापत्रकाराचे जीवन बरबाद होऊ नये यासाठी आपण राजनाथ सिंह यांना याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली असल्याचे मुफ्ती यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा तथा एनआयएने युसूफ याला गेल्या वर्षी ४ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्याच्यावर ठेवलेल्या आरोपपत्रात युसुफ हा खरा पत्रकार नसल्याचा दावा एनआयएने केला आहे. युसूफ याने कधीही शाळा, रस्ते, पूल यांच्या उद्घाटन समारंभाचे कधी छायांकन केले नाही. किंवा राज्य किंवा केंद्र सत्ताधारी पक्षाच्या तथा राज्य सरकारांचा सामाजिक कार्याचेही छायांकन त्याने कधी केले नाही असे एनआयएने म्हटले असून युसूफ हा सुरक्षा दलांवर दगडफेक करणार्यांना सामील असल्याचा आरोप केला आहे.