सम्राट वझरी उपांत्यपूर्व फेरीत

0
90

>> श्री महादेव भूमिका चषक टी-२० क्रिकेट

सम्राट स्पोटर्‌‌स क्लब वझरी संघाने हणजुण कायसूव पंचायत संघावर ३३ धावांनी मात करीत सिद्धान्त स्पोटर्‌‌स क्लब साळ आयोजित व उद्योजक मेघःश्याम राऊत पुरस्कृत अखिल गोवा आंतर ग्रामपंचायत मर्यादित श्री महादेव भूमिका चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

साळ सरकारी हायस्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात सम्राट वझरीने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावत १५० अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात हणजुण-कायसूव पंचायतीला ८ गड्यांच्या मोबदल्यात ११७ धावांपर्यंत मजल मारता आली. सामनावीर म्हणून गौरव नाईकची (सम्राट वझरी) निवड करण्यात आली.

संक्षिप्त धावफलक ः सम्राट स्पोटर्‌‌स क्लब, वझरी, १७ षट्‌कांत ७ बाद १५०, (आशिष नाईक ४३, कृष्णा शेट्ये व दिनेश सावळ प्रत्येकी २२, विनोद नाईक १९, सगुण गावडे १३ धावा. श्याम कळंगुटकर ३, रुपेश पोपकर, पुंडलीक मडगावकर, समिर चोडणकर, गणेश फडते प्रत्येकी १ बळी) विजयी वि. हणजुण कायसुव पंचायत, १७ षट्‌कांत ८ बाद ११७, (काशिनाथ गावकर ३६, समिर चोडणकर व गणेश फडते प्रत्येकी १८, अर्जुन मोरजकर १० धावा. गौरव नाईक ५, शंकर गावकर २, विनोद नाईक १ बळी).