आगोंद समुद्र किनारा आशिया खंडात अव्वल

0
323

काणकोण तालुक्यातील आगोंद समुद्र किनार्‍याने आशिया ट्रेव्हलर्स चॉईस पुरस्काराच्या यादीत प्रथम स्थान पटकाविले आहे. जगातील प्रसिद्ध समुद्र किनार्‍यांमध्ये आगोंद समुद्र किनार्‍याने १८ वा क्रमांक पटकाविले आहे.
आशियातील प्रमुख २५ समुद्र किनार्‍यांमध्ये देशातील पाच समुद्र किनार्‍यांचा समावेश होत आहे. यात गोव्यातील एकूण चार समुद्र किनार्‍यांचा समावेश होत आहे. आगोंद किनार्‍यावर तीन किलो मीटरचा लांबच लांब रुपेरी वाळूचा पट्टा, आकर्षक शॅक्स आणि कासव संवर्धन केंद्राचा समावेश आहे. ट्रेव्हलर्स चॉईस समुद्र किनारे पुरस्काराची आशिया यादी जाहीर करण्यात आली आहे. यात दक्षिण गोव्यातील बाणावली समुद्र किनारा १५ व्या स्थानी, पेडणे तालुक्यातील मांद्रे समुद्र किनारा १८ व्या स्थानी आणि काणकोण तालुक्यातील आणखीन एक पाळोळे समुद्र किनारा २० व्या स्थानी आहे. ट्रीप ऍडव्हायझरच्या ट्रॅव्हल्स साइटचा आढावा घेऊन यादी निश्‍चित केली जाते.