आमला, मारक्रमला विश्रांती

0
74

जोहान्सबर्ग येथे १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने काल संघ जाहीर केला. ख्रिस्टियन जोंकर, ज्युनियर डाला व हेन्रिक क्लासेन यांना या संघात निवडण्यात आले आहे. फाफ ड्युप्लेसीच्या अनुपस्थितीत जेपी ड्युमिनी संघाचे नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका नजरेसमोर ठेवून ऐडन मारक्रम, हाशिम आमला यांना विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी लेगस्पिनर इम्रान ताहीरलादेखील संघात स्थान मिळालेले नाही.

दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत क्रिकेटमध्ये वॉरियर्सकडून खेळणारा मध्यफळीतील फलंदाज जोंकर व टायटन्सचा वेगवान गोलंदाज डाला यांनी अजूनपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. तर क्लासेन याने सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेद्वारे आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
दक्षिण आफ्रिका टी-२० संघ ः जेपी ड्युमिनी, फरहान बेहार्दिन, ज्युनियर डाला, एबी डीव्हिलियर्स, रिझा हेंड्रिक्स, ख्रिस्टियन जोंकर, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, डेन पीटरसन, ऍरोन फंगिसो, आंदिले फेलुकवायो, तबरेझ शम्सी व जॉन जॉन स्मट्‌स.