इस्पितळावर हल्ला चढवून पाकिस्तानी दहशतवादी फरार

0
249

श्रीनगरमधील एका इस्पितळावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवून इस्पितळात आरोग्य तपासणीसाठी आणलेल्या एका पाकिस्तानी कैद्याला पळवून नेण्याची घटना काल घडली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले असून अनेक पोलीस जखमी झाले आहेत. पळून गेलेला दहशतवादी अबू हंजुला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

श्रीनगरच्या एसएमएचएस इस्पितळावर काल दुपारी दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. दहशतवादी अबू हंजुला याची तपासणी करण्यासाठी इस्पितळात आणण्यात आले होते. त्याचा सुगावा दहशतवाद्यांना लागल्याने त्यांनी हंजुलाला सोडवण्यासाठी इस्पितळावर हल्ला चढविला. इस्पितळात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. पळून गेलेल्या हंजुलानेही पोलिसांच्या हातातून रायफल हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात दोन पोलीस हुतात्मा झाले. दरम्यान, यावेळी हंजुला पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याचा उधमपूर येथील हल्ल्यात हात होता. तो पाकिस्तानचा नागरिक असून त्याला कुलगाममध्ये अटक झाली होती.