उनाडकट सर्वांत महागडा भारतीय

0
97

>> दोन दिवसीय आयपीएल लिलाव संपन्न

>> नेपाळचा लामिछाने डेअरडेव्हिल्सकडे

इंडियन प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव शनिवार व रविवारी झाला. या लिलावात सहभागी फ्रेंचायझींनी संघबांधणीसाठी मोठ्या उत्साहाने भाग घेत खेळाडूंची निवड केली. या दोनदिवसीय लिलावात इंग्लंडचा बेन स्टोक्स सर्वांत महागडा विदेशी तर जयदेव उनाडकट सर्वांत जास्त रक्कम मोजलेला देशी खेळाडू ठरला. रजत भाटिया, अशोक दिंडा, डेव्हिड विसे, मॉर्ने मॉर्कल, थिसारा परेरा, उन्मुक्त चंद, वरुण ऍरोन, प्रग्यान ओझा, शॉन मार्श, ऑईन मॉर्गन, हाशिम आमला, लसिथ मलिंगा, इशांत शर्मा, मिचेल मॅकलेनाघन या काही नावाजलेल्या खेळाडूंना एकाही फ्रेंचायझीने खरेदी केले नाही.

दोन दिवसांच्या लिलावानंतर फ्रेंचायझींची स्थिती

किंग्स इलेव्हन पंजाब (२१)
राखलेला खेळाडू ः अक्षर पटेल, लिलावात खरेदी खेळाडू ः अंकित राजपूत (३ कोटी), मयंक अगरवाल (१ कोटी), मार्कुस स्टोईनिस (६.२ कोटी, आरटीएम), ऍरोन फिंच (६.२ कोटी), डेव्हिड मिलर (३.२ कोटी, आरटीएम), लोकेश राहुल (११ कोटी), करुण नायर (५.६ कोटी), युवराज सिंग (२ कोटी), रविचंद्रन अश्‍विन (७.६ कोटी), मनोज तिवारी (१ कोटी), मोहित शर्मा (२.४ कोटी, आरटीएम), मुजीब झादरान (४ कोटी), बरिंदर सरन (२.२ कोटी), अँडी टाय (७.२ कोटी), अक्षदीप नाथ (१ कोटी), बेन ड्वारशियस (१.४ कोटी), परदीप साहू (२० लाख), मयांक डागर (२० लाख), ख्रिस गेल (२ कोटी), मंझूर दार (२० लाख).

राजस्थान रॉयल्स (२३)
राखलेला खेळाडू ः स्टीव स्मिथ, लिलावात खरेदी खेळाडू ः जोफ्रा आर्चर (७.२ कोटी), डार्सी शॉर्ट (४ कोटी), राहुल त्रिपाठी (३.४ कोटी), जोस बटलर (४.४ कोटी), संजू सॅमसन (८ कोटी), स्टुअर्ट बिन्नी (५० लाख), अजिंक्य रहाणे (४ कोटी, आरटीएम), बेन स्टोक्स (१२.५ कोटी), कृष्णप्पा गौतम (६.२ कोटी), धवल कुलकर्णी (७५ लाख,आरटीएम), जयदेव उनाडकट (११.५ कोटी), अंकित शर्मा (२० लाख), अनुरित सिंग (३० लाख), झाहीर खान (६० लाख), श्रेयस गोपाळ (२० लाख), सुदीसन मिधुन (२० लाख), प्रशांत चोप्रा (२० लाख), बेन लॉलिन (५० लाख), महिपाल लोमरोर (२० लाख), जतीन सक्सेना (२० लाख), आर्यमान बिर्ला (३० लाख), दुष्मंथ चमीरा (५० लाख).

चेन्नई सुपरकिंग्स (२५)
राखलेले खेळाडू ः महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना व रवींद्र जडेजा, लिलावार खरेदी खेळाडूः कर्ण शर्मा (५ कोटी), इम्रान ताहीर (१ कोटी), अंबाती रायडू (२.२ कोटी), केदार जाधव (७.८ कोटी), शेन वॉटसन (४ कोटी), ड्वेन ब्राव्हो (६.४ कोटी, आरटीएम), हरभजन सिंग (२ कोटी), फाफ ड्युप्लेसिस (१.६ कोटी, आरटीएम), शार्दुल ठाकूर (२.६ कोटी), जगदीशन नारायणन (२० लाख), मिचेल सेंटनर (५० लाख), दीपक चाहर (८० लाख), केएम आसिफ (४० लाख), लुंगी एनगिडी (५० लाख), कनिष्क सेठ (२० लाख), ध्रुव शोरे (२० लाख), मुरली विजय (२ कोटी), सॅम बिलिंग्स (१ कोटी), मार्क वूड (१.५ कोटी), क्षितिज शर्मा २० लाख), मोनू सिंग (२० लाख), चैतन्य बिश्‍नोई (२० लाख),

मुंबई इंडियन्स (२५)
राखलेले खेळाडू ः रोहित शर्मा, हार्दिक पंड्या व जसप्रीत बुमराह ः लिलावात खरेदी केलेले खेळाडू ः ईशान किशन (६.२ कोटी), कृणाल पंड्या (८.८ कोटी, आरटीएम), सूर्यकुमार यादव (३.२ कोटी), पॅट कमिन्स (५.४ कोटी), मुस्तफिझुर रहमान (२.२ कोटी), कायरन पोलार्ड (५.४ कोटी, आरटीएम), राहुल चाहर (१.९ कोटी), एविन लुईस (३.८ कोटी), सौरभ तिवारी (८० लाख), बेन कटिंग (२.२ कोटी), प्रदीप संगवान (१.५ कोटी), जेपी ड्युमिनी (१ कोटी), जेसन बेहरेनडॉर्फ (१.५ कोटी), तजिंदर सिंग (५५ लाख), शरद लुंबा (२० लाख), सिद्धेश लाड (२० लाख), आदित्य तरे (२० लाख), मयांक मार्कंडे (२० लाख), अकिला धनंजया (५० लाख), अनुकूल रॉय (२० लाख), मोहसिन खान (२० लाख), एमडी निधीश (२० लाख).

सनरायझर्स हैदराबाद (२५)
राखलेले खेळाडू ः डेव्हिड वॉर्नर व भुवनेश्‍वर कुमार, लिलावात खरेदी खेळाडू ः खलिल अहमद (३ कोटी), बासिल थम्पी (९५ लाख), थंगरसू नटराजन (४० लाख), सिध्दार्थ कौल (३.८ कोटी), दीपक हुडा (३.६ कोटी, आरटीएम), रिकी भुई (२० लाख), रशिद खान (९ कोटी,आरटीएम), वृध्दिमान साहा (५ कोटी), युसूफ पठाण (१.९ कोटी), कार्लोस ब्रेथवेट (२ कोटी), मनीष पांडे (११ कोटी), केन विल्यमसन (३ कोटी), शाकिब अल हसन (२ कोटी), शिखर धवन (५.८ कोटी, आरटीएम), मोहम्मद नबी (१ कोटी), संदीप शर्मा (३ कोटी), सचिन बेबी (२० लाख), ख्रिस जॉर्डन (१ कोटी), बिली स्टेनलेक (५० लाख), तन्मय अगरवाल (२० लाख), श्रीवत्स गोस्वामी (१ कोटी), बिपुल शर्मा (२० लाख), मेहदी हसन (२० लाख).

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (२४)
राखलेले खेळाडू ः विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स व सर्फराज खान ः लिलावात खरेदी खेळाडू ः नवदीप सैनी (३ कोटी), अनिकेत चौधरी (३० लाख), कुलवंत खेजरोलिया (८५ लाख), मनन वोहरा (१.१ कोटी), युजवेंद्र चहल (६ कोटी, आरटीएम), उमेश यादव (४.२ कोटी), क्विंटन डी कॉक (२.८ कोटी), मोईन अली (१.७ कोटी), कॉलिन डी ग्रँडहोम (२.२ कोटी), ख्रिस वोक्स (७.४ कोटी), ब्रेंडन मॅक्कलम (३.६ कोटी), मुरुगन अश्‍विन (२.२ कोटी), मनदीप सिंग (१.४ कोटी), वॉशिंग्टन सुंदर (३.२ कोटी), पवन नेगी (१ कोटी, आरटीएम), मोहम्मद सिराज (२.६ कोटी), नॅथन कुल्टर नाईल (२.२ कोटी), अनिरुद्ध जोशी (२० लाख), पार्थिव पटेल (१.७ कोटी), टिम साऊथी (१ कोटी), पवन देशपांडे (२० लाख).

कोलकाता नाईट रायडर्स (१९)
राखलेले खेळाडू ः आंद्रे रसेल व सुनील नारायण ः लिलावात खरेदी खेळाडू ः नितीश राणा (३.४ कोटी), कमलेश नागरकोटी (३.२ कोटी), इशांक जग्गी (२० लाख), शुभमन गिल (१.८ कोटी), कुलदीप यादव (५.८ कोटी, आरटीएम), पीयुष चावला (४.२ कोटी, आरटीएम), रॉबिन उथप्पा (६.४ कोटी, आरटीएम), दिनेश कार्तिक (७.४ कोटी), ख्रिस लिन(९.६ कोटी), मिचेल स्टार्क (९.४ कोटी), विनयकुमार (१ कोटी), अपूर्व वानखेडे (२० लाख), रिंकू सिंग (८० लाख), शिवम मावी (३ कोटी), कँमरून डेलपोर्ट (३० लाख), मिचेल जॉन्सन (२ कोटी), जेवोन सिअर्ल्स (३० लाख).

दिल्ली डेअरडेव्हिल्स (२५)
राखलेले खेळाडू ः ऋषभ पंत, श्रेयस अय्यर व ख्रिस मॉरिस ः लिलावात खरेदी खेळाडू ः अवेश खान (३० लाख), हर्षल पटेल (२० लाख), विजय शंकर (३.२ कोटी), राहुल तेवतिया (३ कोटी), पृथ्वी शॉ (१.२ कोटी), अमित मिश्रा (४ कोटी), कगिसो रबाडा (४.२ कोटी, आरटीएम), मोहम्मद शमी (३ कोटी, आरटीएम), कॉलिन मन्रो (१.९ कोटी), जेसन रॉय (१.५ कोटी), गौतम गंभीर (२.८ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (९ कोटी), शहाबाज नदीम (३.२ कोटी), डॅन ख्रिस्टियन (१.५ कोटी), जयंत यादव (५० लाख), गुरकिरत सिंग (७५ लाख), ट्रेंट बोल्ट (२.२ कोटी), मनजोत कालरा (२० लाख), अभिषेक शर्मा (५५ लाख), संदीप लामिछाने (२० लाख), नमन ओझा (१.४ कोटी), सयान घोष (२० लाख),