देशाच्या खाण पट्ट्यातील जनतेच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेला जिल्हा खनिज निधी १३ हजार कोटी रुपये एवढा झाला असल्याची माहिती काल केंद्रीय खाणमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२०२० सालापर्यंत देशभरातील ज्या खाणींच्या लिजेसची मुदत संपेल त्या खाणीचा लिलाव करण्यात येणार असल्याचे केंद्रीय खाणमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. २१ राज्यातील खाण मंत्र्यांच्या बांबोळी येथील परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. २०२० साली देशभरातील खाणींच्या लिजेसची मुदत संपणार असून ज्या खाणींच्या लिजेसची मुदत संपेल त्या खाणींचा लिलाव करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे तोमर म्हणाले. आतापर्यंत झालेल्या खाणींच्या लिलावाद्वारे राज्यांना १ लाख २८ हजार कोटी रु. एवढा महसूल प्राप्त झाला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते.
२०१८ ते २०१९ या आर्थिक वर्षी ५१ खाणपट्ट्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.