गोवा ट्रायथ्लॉनसाठी ४५० जणांनी नोंदणी

0
106

पाचवी गोवा ट्रायथ्लॉन स्पर्धा बांबोळी येथे रविवार ११ फेब्रुवारी रोजी होणार असून या स्पर्धेसाठी आत्तापर्यंत ४५० जणांनी नोंदणी केली असल्याची माहिती एन्ड्यरो स्पोटर्‌‌स गोवाचे सह संस्थापक इलियास पटेल यांनी काल पत्रकारपरिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत दृष्टी मरिनचे अपूर्व नाईक, मणिपाल हॉस्पिटल्सचे डॉ. दीप भांडारे व एन्ड्यरो स्पोटर्‌‌सचे सदस्य रोनाल्ड फर्नांडिस उपस्थित होते.

गोव्यातील ३४ जणांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली असून मागील वर्षाच्या तुलनेत महिला सहभागींची संख्या ५ ते १० टक्क्यांनी वाढल्याचे पटेल यांनी पुढे बोलताना सांगितले. पुणे येथे ६९ वर्षीय सहभागी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत ज्येष्ठ खेळाडू असेल तसेच २ विशेष खेळाडूदेखील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भाग घेणार असल्याने पटेल यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. स्प्रिट ड्युअथलॉन (४.५ किमी धावणे, २२ किमी सायकल, २.५ किमी धावणे), ऑलिम्पिक ट्रायथ्लॉन (१.५ किमी स्वीमिंग, ४० किमी सायकल, १० किमी धावणे) तसेच सुपर स्प्रिंट ट्रायथ्लॉन (४०० मीटर स्वीमिंग, १० किमी सायकल व २.५ किमी धावणे) या तीन प्रकारात सदर स्पर्धा होणार आहे. २९ जानेवारीपर्यंत प्रवेश खुला असून अधिक माहितीसाठी ुुु.शपर्वीीेीिेीींीसेर.लेा या संकेतस्थळाला भेट द्या.