कार्निव्हलच्या चित्ररथ मिवरणुकीमुळे पणजी शहरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत असल्याने सरकारने यंदा कार्निव्हल मिरवणूक पणजी शहराबाहेर नेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
यंदा पणजीची कार्निव्हल चित्ररथ मिवरणूक मिरामार सर्कल ते दोनापावला अशी होणार असल्याची माहिती जीटीडीसीचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत ही चित्ररथ मिरवणूक मांडवी पुलाखालील सांता मोनिका जेटी ते कला अकादमी अशी होत होती. पण त्यासाठी पणजी ते मिरामार हा रस्ता बंद ठेवावा लागत असल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत असे. त्यामुळे यंदा पणजीतील कार्निव्हल मिवरणूक मिरामार सर्कल ते दोनापावला या दरम्यान घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतला असल्याचे काब्राल यांनी सांगितले.
ब्राझिलच्या पथकाला निमंत्रण नाही
पणजीतील कार्निव्हलसाठी ब्राझिलच्या पथकाला निमंत्रण देण्यात आले नाही असे त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यानी स्पष्ट केले. पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी तशी माहिती दिली होती असे त्यांच्या नजरेस आणून दिले असता ते म्हणाले की पणजी तसेच अन्य शहरांत पारंपारिक कार्निव्हल तीन दिवस असतो.