>> सासष्टी तालुका अंडर-१४ क्रिकेट
भाटिकर मॉडेल हायस्कूलने महिला नूतन हायस्कूलचा ७ गड्यांनी पराभव करीत गोवा क्रिकेट संघटना आयोजित अंडर-१४ सासष्टी विभाग प्रेसिडेंट कप आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. भाटिकर मॉडेल स्कूलचे हे सलग सहावे जेतेपद होय.
मडगावच्या डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महिला नूतन हायस्कूलला केवळ ८६ अशी धावसंख्या उभारता आली. प्रत्युत्तरात खेळताना भाटिकर मॉडेल हायस्कूलने विजयी लक्ष्य केवळ ३ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. संक्षिप्त धावफलक ः महिला नूतन हायस्कूल, ३८ षट्कांत सर्वबाद ८६, (अच्युत दलाल ३०, रिझुल पाठक २२ धावा. विष्णू वॉरियर ३-११. देवेन चित्तेम २ १४ बळी) पराभूत वि. भाटिकर मॉडेल स्कूल, २१ षट्कांत ३ बाद ८७, (देवेन चित्तेम नाबाद ४१, शिवम पार्सेकर व विष्णू वॉरियर प्रत्येकी १० धावा. रिझुल पाठक २-१९ बळी).