माऊंट मेरी नागोवाला फुटबॉल जेतेपद

0
119

माऊंट मेरी नागोवाने अंतिम सामन्यात रिबेलो पंडाल संघावर १-० अशी मात करीत अंबलाई यूथ पंचवाडी आयोजित ७ खेळाडूंच्या अखिल गोवा फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

अंबलाई -पंचवाडी येथील मात्तेम मैदानावर खेळविण्यात आलेल्या या अंतिम सामन्यातील एकमेव विजयी गोल ३६व्या मिनिटाला बेंजामिन बार्रेटोने नोंदविला.
बक्षीस वितरण सोहळ्याला माजी फुटबॉलपटू झेवियर डिकॉस्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. विजेत्या संघाला रु. २५,००० तर उपविजेत्यांना रु. १५,००० अशी बक्षिसे प्रदान करण्यात आली.