स्पोर्टिंग दवर्ली उपांत्य फेरीत

0
77

स्पोर्टिंग क्लब दवर्लीने रोझमन क्रूझ नागवा वेर्णावर ३-१ गोलने विजय मिळवित बेताळभाटी स्पोर्टिंग क्लब आयोजित मार्टिन कप फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. हा सामना बेताळभाटी मैदानावर झाला. १६ व्या मिनिटाला मार्क बोर्जीसने गोल करीत दवर्लीला आघाडीवर नेले. ३५ व्या मिनिटाला रोझमनच्या एजुदेव फर्नांडिसने १-१ असी बरोबरी साधून देणारा गोल झळकावला. ३८ व्या मिनिटाला अँड्र्यू कुलासोने दुसरा गोल नोंदवीत दवर्लीला २-१ असे आघाडीवर नेले. विजयावर शिक्कामोर्तब करणारा तिसरा गोल आग्नेल कुलासोने नोंदविला. नागवा संघातील खेळाडूंनी गोल नोंदविण्याचे केलेले प्रयत्न स्पोर्टिंगच्या बचावफळीने निष्फळ ठरविले.