>> मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
मालेगाल बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह, रमेश उपाध्याय, अजय राहिकर, ले. कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांची मोक्का कायद्यातून काल मुक्तता केली. यामुळे या सर्वांविरोधात आता मोक्काअंतर्गत खटला चालणार नाही. त्यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याखाली कलम १८ आणि भा. दं. सं. कलमांतर्गत खटला चालणार आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयात काल सुनावणी झाली. साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांनी आरोपमुक्त करण्याची केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. मात्र, दुसरीकडे त्यांना मोक्का कलमातून मुक्त केले.
बॉम्बस्फोटातील दुचाकीचा वापर कशासाठी होणार याची साध्वी प्रज्ञाला कल्पना होती. त्यामुळे साध्वी प्रज्ञाची कटाच्या आरोपातून सुटका करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.