मुंबईच्या परी इलेव्हन आणि चिंबलच्या श्रीकृष्ण संघाने सांगे येथील सनशाईन क्रिकेटर्स आयोजित सनशाईन अखिल भारत टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. सांगे शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा खेळविण्यात येत आहे. स्पर्धेचे उद्घाटन सांगेेचे आमदार प्रसाद गावकर यांच्याहस्ते झाले. यावेळी सांगेचे नगराध्यक्ष सूर्यदत्त नाईक व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. सनशाईन क्रिकेटर्सचे अध्यक्ष सुशांत नाईक यांनी सर्वांचे स्वागत आणि नंतर आभार व्यक्त केले. उद्घाटनानंतर खेळविण्यात आलेल्या साखळी सामन्यांत मुंबईच्या परी इलेव्हन संघाने पणजीच्या भाटले टायगर्सचा १० गड्यांनी तर सांगेच्या कवळेकर ब्रदर्सचा ३ गड्यांनी पराभव करीत पुढील फेरी गाठली. तर श्रीकृष्ण क्रिकेटर्सने कवळेकर ब्रदर्सचा ८ गड्यांनी पराभव केला. तर नंतर परी इलेव्हनवर १२ धावांनी मात केली.