राहुल गांधींच्या निवडीवर शिक्कामोर्तब

0
84

>> शनिवारी पदभार स्वीकारणार

अखेर कॉंग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या निवडीवर काल औपचारिकपणे शिक्कामोर्तब करण्यात आले. यानुसार येत्या दि. १६ रोजी राहुल त्यांची आई तथा मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. अध्यक्षपदाच्या निडणुकीत अन्य कोणीही उमेदवार नसल्याने राहुल गांधींची बिनविरोध निवड झाली होती.

सोनिया गांधी १९ वर्षे कॉंग्रेसाध्यक्षपदी होत्या. या पक्षाच्या इतिहासात एवढा प्रदिर्घ काळ एका व्यक्तीने प्रथमच अध्यक्षपद भूषवले आहे. गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी उपाध्यक्षपदावर होते. त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे कधी जाणार याची चर्चा सातत्याने सुरु होती. मात्र त्यांची राजकीय अपरिपक्वता, धरसोड वृत्ती यामुळे त्यांची या पदावरील वर्णी लागणे लांबणीवर पडले. अलीकडील काळात कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल यांना अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी आग्रह धरला होता.