सुंदर, हूडा, थम्पीचा समावेश

0
81

>> श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहली व शिखर धवन यांना विश्रांती देण्यात आली आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. तमिळनाडूचा १८ वर्षीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर, बडोदाचा आक्रमक फलंदाज दीपक हूडा व केरळचा जलदगती गोलंदाज बासिल थम्पी या तीन नव्या चेहर्‍यांना या मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. मागील वर्षी जून महिन्यात अखेरच्या वेळी आंतररष्ष्ट्रीय क्रिकेट खेळलेला सौराष्ट्रचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज जयदेव उनाडकट याने आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर संघात पुनरागमन केले आहे. तीन टी-२० सामने कटक (२० डिसेंबर), इंदूर (२२ डिसें.) व मुंबई (२४ डिसें.) येथे होणार आहेत.
भारतीय संघ ः रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हूडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी व जयदेव उनाडकट.