सां जुझे दी आरियलने तिळामळ युनायटेडवर टायब्रेकरच्या आधारे ६-४ असी मात करत ‘सेरावली ग्रामपंचायत चषक २०१७’च्या अंतिम आठ संघांत स्थान मिळविले. सेरावलीच्या युनायटेड स्पोटर्स क्लबने ख्रि. लिगोरियो गोम्स यांच्या स्मृतिप्रत्यर्थ सेरावली मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. आरियलचा पहिला गोल नेव्हिल सुआरिस याने २१व्या मिनिटाला नोंदविला. तीन मिनिटांनंतर जोवितो कार्व्हालो याने संघाचा दुसरा गोल केला. लिओ फर्नांडिस याने ५२व्या व ५४व्या मिनिटाला गोल नोंदवून तिळामळला बरोबरी साधून दिली. यानंतर टायब्रेकरवर आरियलने बाजी मारली.