मोरपिर्ला सरकारी हायस्कूलला खो-खोत दुहेरी मुकुट

0
86

मोरपिर्ल येथील सरकारी हायस्कूलने क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय आयोजित आंतर शालेय खो-खो केपे तालुका स्तरीय स्पर्धेत अंडर-१४ आणि अंडर-१७ मुलांच्या विभागाची जेतेपदे प्राप्त करीत दुहेरी मुकुट पटकाविला. बोरिमळ-केपे येथील क्रीडा संकुलात खेळविण्यात या स्पर्धा खेळविण्यात आल्या.

अंडर-१४ मुलांच्या अंतिम सामन्यात सरकारी हायस्कूल मोरपिर्लाने सरकारी हायस्कूल पाडीचा ११-२ असा एकतर्फी पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य लढतींत सरकारी हायस्कूल मोरपिर्लाने सरकारी हायस्कूल मायणाचा १६-२ असा पराभव केला. तर सरकारी हायस्कूल पाडीने सरकारी हायस्कूल शेल्डेवर १०-९ अशा गुणफरकाने निसटती मात केली. सराकारी हायस्कूल मायणाने सरकारी हायस्कूल शेल्डेवर ९-८ अशा एक गुणाच्या फरकाने मात करीत तृतीय स्थान मिळविले.

दरम्यान, अंडर-१७ विभागाच्या अंतिम सामन्यात सरकारी हायस्कूल मोरपिर्लाने सरकारी हायस्कूल मायणाचा ७-२ अशा गुणफरकाने पराभव करीत जेतेपद प्राप्त केले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत सरकारी हायस्कूल मोरपिर्लाने सरकारी हायस्कूल पाडीवर १८-९ अशी मात केली. तर सरकारी हायस्कूल मायणाने सरकारी हायस्कूल शेल्डेचा ९-७ असा असा निसटता पराभव केला. सरकारी हायस्कूल पाडीने सरकारी हायस्कूल शेल्डेवर ८-३ अशी मात करीत तृतीय स्थान मिळविले.