‘पॅराडाईज पेपर्स’ संदर्भात यंत्रणांद्वारे संयुक्त तपास

0
144

शोध पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने उघड केलेल्या ‘पॅराडाईज पेपर्स’ संदर्भात भारत सरकारच्या आर्थिक गुन्हेविषयक तपास यंत्रणांच्या एका संयुक्त समितीद्वारे चौकशी करण्याची तयारी सरकारने चालवली आहे.
१३.४ दशलक्ष कागदपत्रांच्या छाननीतून जगभरातील बड्या कॉर्पोरेटस्‌नी १९ करमुक्त देशांमध्ये केलेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहिती उघड झाली असून त्यात ७१४ भारतीयांची नावे आढळली आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन, संजय दत्तची पत्नी मान्यता, केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा, कार्ती चिदंबरम, विजय मल्ल्या अशी अनेकांची नावे त्यात आहेत.

बर्म्युडामधील कॉर्पोरेट सल्लागार कंपनी एपलबीशी संबंधित ही कागदपत्रे उजेडात आली असून त्यामुळे अनेक देशांतील बड्या व्यक्ती आणि कंपन्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांवर प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गैरव्यवहारासंदर्भात सीबीआय, अमलबजावणी संचालनालय आदींचे एक तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे.