तिसवाडी १३९, सासष्टी ४ बाद ५७

0
129

>> जीनो अंडर-१६ क्रिकेट

तिसवाडी विभागाचा डाव १३९ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर अंडर -१६ जीनो चषक क्रिकेट स्पर्धेत काल दोन दिवशीय उपांत्य फेरीत काल पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सासष्टी विभागाने ४ गड्यांच्या मोबदल्यात ५७ धावा बनविल्या आहेत. म्हापसाच्या जीनो स्पोटर्‌‌स क्लबतर्फे कांपाल पणजी येथील सागच्या मैदानावर ही स्पर्धा खेळविली जात आहे.

प्रथम फलंदाजी करताना तिवाडी संघाचा डाव ५०.४ षट्‌कांत १३९ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्या आनंद अधिकारीने सर्वाधिक नाबाद ४५ धावा जोडल्या. पार्थ तेलीने ३१ तर वेदान्त घाटवळने १९ धावांचे योगदान दिले. सासष्टीतर्फे दीप कासवणकर आणि जगदीश पाटील यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर मनिष पै काकोडेने २ बळी मिळविले. प्रत्युत्तरात तिवाडीनेही तिखट मारा करताना काल पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३८ षट्‌कांच्या खेळात सासष्टीची स्थिती ४ बाद ५७ अशी केली आहे. सासष्टी अजून ८२ धावांनी पिछाडीवर आहे. ओंकार भंडारीने २७ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक ः तिसवाडी विभाग, पहिला डाव, ५०.४ षट्‌कांत ४ बाद १३९, (आनंद अधिकारी नाबाद ४५, पार्थ तेली ३१, वेदान्त घाटवळ १९ धावा. दीप कासवणकर ३-३६, जगदीश पाटील ३-३९, शुभम गजिनकर २-८, वेदान्ग बांदेकर व ओमप्रकाश लेंका प्रत्येकी १ बळी), सासष्टी पहिला डाव, ३८ षटकांत ४ बाद ५७, (ओंकार भंडारी २७, आयुष वेर्लेकर नाबाद ७ धावा. मनिष पै काकोडे २-१२, प्रथमेश परिहार आणि आनंद अधिकारी प्रत्येकी १ बळी).