गगन नारंगला रौप्य पदक

0
78

ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या भारताच्या गगन नारंगने ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आज ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदक प्राप्त केले. पात्रता फेरीत नारंग ६१७.६ गुणांसह चौथ्या स्थानी राहिला होता. परंतु अंतिम फेरीत २४६.३ गुणांसह त्याने रौप्य पदकाची कमाई केली.

भारताच्याच स्वप्नील सुरेश कुसळे याने या प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. ऑस्ट्रेलियाच्या डेन सँपसनला सुवर्णपदक प्राप्त झाले. तर महिलांच्या ५० मी. पिस्तोल प्रकारात भारताच्या अन्नू राज सिंह हिने कांस्य पदक प्राप्त केले.