
>> तिसरा सामना सहा धावांनी जिंकला
>> रोहित शर्मा, विराट कोहलीची शतके सार्थकी
तिसर्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ६ धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. कालच्या विजयासह भारताने सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
नाणेङ्गेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडच्या अंगाशी आला. प्रथम ङ्गलंदाजी करणार्या भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या शतकांच्या जोरावर ६ बाद ३३७ अशी मजल मारली.
३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली. पहिल्याच षटकात १९ धावा कुटून पाहुण्या संघाने आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या दोन्ही सामन्यात भेदक मारा केलेल्या भुवनेश्वर कुमारला लक्ष्य करत न्यूझीलंडने त्याची दिशा व लय भरकटून टाकली. यानंतर पंड्याची गोलंदाजीदेखील झोडपून काढत कोहलीसमोर चिंता निर्माण केली. यावेळी कामचलाऊ गोलंदाज केदार जाधवची गोलंदाजी कामी आली. सहापेक्षा जास्तच्या गतीने त्याने धावा दिल्या असल्या तरी मधल्या षटकांत त्याने न्यूझीलंडची धावगती बर्यापैकी आटोक्यात आणली.
न्यूझीलंकडनू कॉलिन मन्रो आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी खणखणीत अर्धशतके ठोकली आणि शतकी भागीदारी केली. चहलने मन्रो आणि विल्यमसन या दोघांचाही अडथळा दूर करून न्यूझीलंडला बॅकफुटवर ढकलले. न्यूझीलंडने या दोघांच्या पतनानंतरही विजयाच्या दिशेने मार्गक्रमण सुरूच ठेवले. टॉम लेथम याने अर्धशतकी खेळी करत रॉस टेलरच्या साथीने न्यूझीलंडला विजयाच्या जवळ नेले. मात्र न्यूझीलंडची धावसंख्या ३१२ असतानाच लेथम धावबाद झाला आणि सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. शेवटच्या षटकांमध्ये बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करत न्यूझीलंडला ३३१ धावांवर रोखले आणि भारताने सहा धावांनी हा अटीतटीचा सामना जिंकला.
धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. साऊथी गो. सेंटनर १४७, शिखर धवन झे. विल्यमसन गो. साऊथी १४, विराट कोहली झे. विल्यमसन गो. साऊथी ११३, हार्दिक पंड्या झे. साऊथी गो. सेंटनर ८, महेंद्रसिंग धोनी झे. मन्रो गो. मिल्ने २५, केदार जाधव झे. गप्टिल गो. मिल्ने १८, दिनेश कार्तिक नाबाद ४, अवांतर ८, एकूण ५० षटकांत ६ बाद ३३७
गोलंदाजी ः टिम साऊथी १०-०-६६-२, ट्रेंट बोल्ट १०-०-८१-०, ऍडम मिल्ने १०-०-६४-२, कॉलिन डी ग्रँडहोम ८-०-५७-०, मिचेल सेंटनर १०-०-५८-२, कॉलिन मन्रो २-०-१०-०
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल झे. कार्तिक गो. बुमराह १०, कॉलिन मन्रो त्रि. गो. चहल ७५, केन विल्यमसन झे. धोनी गो. चहल ६४, रॉस टेलर झे. जाधव गो. बुमराह ३९, टॉम लेथम धावबाद ६५, हेन्री निकोल्स त्रि. गो. भुवनेश्वर ३७, कॉलिन डी ग्रँडहोम नाबाद ८, मिचेल सेंटनर झे. धवन गो. बुमराह ९, टिम साऊथी नाबाद ४, अवांतर २०, एकूण ५० षटकांत ७ बाद ३३१
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार १०-०-९२-१, जसप्रीत बुमराह १०-०-४७-३, हार्दिक पंड्या ५-०-४७-०, अक्षर पटेल ७-०-४०-०, केदार जाधव ८-०-५४-०, युजवेंद्र चहल १०-०-४७-२