आर्थिकदृष्ट्या ८५ ग्रामपंचायती

0
145

>> राज्य सरकारची यादी जाहीर, पेडण्यात सर्वाधिक संख्या

सरकारने २०१७ – १८ या वर्षासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्रामपंचायतीची यादी जाहीर केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार राज्यातील ८५ ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत.
पेडणे तालुक्यातील सर्वात जास्त १६ पंचायती आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत.
सरकारकडून आर्थिकदृष्ट्या कमकुवत पंचायतीसाठी खास अनुदान उपलब्ध करून दिले जाते. राज्यातील सर्व १९१ पंचायतींच्या आर्थिक व्यवहाराचा आढावा घेतल्यानंतर आर्थिकदृष्ट्या कमकुवत पंचायतीची यादी तयार करण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत पंचायती
आर्थिकदृष्ट्या कमकुवत पंचायतीमध्ये – तिसवाडी तालुक्यातील – आजोशी – मंडूर, चोडण- माडेल, कुंभारजुवा, सा- मातियश, सेंट लॉरेन्स (आगशी) या पंचायतींचा समावेश आहे. पेडणे तालुक्यात – आगरवाडा – चोपडेे, हर्ळण, कासारवर्णे, चांदेल-हंसापूर, कोरगाव, इब्रामपूर – हणखणे, खाजने- आमरे, मोरजी, वझरी, पालये, पार्शे, केरी-तेरेखोल, तांबोशे – मोप- उगवे, तोरशे, तुये, वारखंड – नागझर या पंचायती येतात.
बार्देश तालुक्यामधून – नास्नोडा, नादोरा, ओशल, कामुर्ली, पिर्ण, पोबुर्पा, रेवडा, वेर्ला – काणका, शिरसई, मोयरा, उस्कई, बेस्ताडा या पंचायतींचा समावेश आहे.
काणकोण तालुक्यामधून – श्रीस्थळ, खोतीगाव, गावडोंगरी, आगोंदा, पैंगिण, खोला, लोलये – पोळे, केपे तालुका – आंबावली, मोरपिर्ला, नाकेरी बेतुल. सांगे तालुका – भाटी, कुर्डी, काले, नेतुर्ली, सावर्डे, उगे. सत्तरी तालुक्यामधून – भिरोंडा, खतोडा, डोंगुर्ली – ठाणे, गुळेली, नगरगाव, पिसुर्ले, सावर्डे, केरी या पंचायतींचा समावेश आहे.
फोंडा तालुका – दुर्भाट, केरी, वळवई, वाडी – तळावली, वेरे – वाघुर्मे. तसेच डिचोली तालुक्यातून – अडवलपाल, मेणकुरे, सुर्ला, मुळगाव, नानोडा, वन मावळिंगे, पिळगाव, साळ, शिरगाव, मये, वेळगे या पंचायती जाहीर करण्यात आल्या आहेत.
सासष्टी तालुका – चांदोर, गिरडोली, राशोल, साराझोरा,पारोडा, असोळणा, धर्मापूर, रूमडामळ, माकाझान, नुवे. मुरगाव विभाग – चिखली – बोगमळो, धारबांदोडा तालुका – किर्लपाल- दाभाळ या ग्रामपंचायतींचा समावेश आर्थिकदृष्ट्या कमकुवत पंचायती म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.