>> जीतू- हिनाचा
जीतू राय व हिना सिद्धू यांनी मिश्र सांघिक प्रकारात एकत्र खेळताना भारताला ‘आयएसएसएफ वर्ल्ड कप फायनल्स’च्या १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर भारतीय दुकलीने ४८३.४ गुणांचा वेध घेत सोनेरी यश प्राप्त केले. ‘२०२० टोकयो ऑलिम्पिक’ स्पर्धेेत मिश्र सांघिक प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या प्रारंभी झालेल्या विश्वचषक स्पर्धांपासून प्रायोगिक तत्वांवर या प्रकाराला स्थान देण्यात आले आहे. फ्रान्सच्या गोबरविले व फॉकेट यांनी ४८१.१ गुण घेत रौप्यपदकाची कमाई केली. चीनच्या काय व यांग जोडीने ४१८.२ गुणांसह कांस्यपदक पटकावले.
भारत पहिल्यांदाच या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असून यात एकूण २५ संघ सहभागी झाले आहेत. यातील ८ संघ मिश्र दुहेरीच्या १० मीटर एअर रायङ्गल आणि १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सहभागी होतील. भारताने या विश्वचषकामध्ये आपले २ संघ उतरवले आहेत. यातील एक संघ रायङ्गल आणि दुसरा पिस्तोल स्पर्धेत आपले आव्हान सादर करणार आहे. यातील पिस्तोल स्पर्धेत हिना सिद्धू आणि जीतू राय मिश्र दुहेरी संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर, एअर रायङ्गल स्पर्धेत दीपक कुमार आणि मेघना यांच्यावर भारताची मदार आहे.