हिमाचल प्रदेश : कॉंग्रेसचे मंत्री अनिल शर्मा यांचा भाजपप्रवेश

0
104

कॉंग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशचे ग्रामीण विकास मंत्री अनिल शर्मा यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. हिमाचल प्रदेशमध्ये ९ नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होत असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला हा धक्का मानला जात आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचे पुत्र असलेल्या शर्मा यांनी मंत्रिपदाचा त्याग करून आपण भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्याचे सांगितले. आपल्याला मंडी विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपले वडील व आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केेलेल्या समितीवर आपल्याला स्थान देण्यात आले नव्हते. प्रदेश अध्यक्षांकडे याविषयी विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठ पातळीवर आपले नाव वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले. यामुळे आपण कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शर्मा म्हणाले.
दरम्यान, खासदार अनुराग ठाकूर यांनी अनिल शर्मा यांचे भाजपमध्ये स्वागत केले आहे.