नितीश कुमार आज देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

0
3

भाजप विधिमंडळ पक्षाची आज बैठक

बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेचे प्रयत्न आता तीव्र झाले आहेत. जेडीयूने आज सोमवारी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. आज सोमवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याची अपेक्षा आहे. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार आज 17 नोव्हेंबर रोजी राज्यपालांकडे राजीनामा सादर करतील आणि त्याच दिवशी नवीन सरकार स्थापनेचा दावादेखील करू शकतात. नितीश कुमार 20 नोव्हेंबर रोजी 10 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे.

2025 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, परंतु नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू पुन्हा एकदा सरकारमध्ये स्थान मिळवण्याची अपेक्षा आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील रालोआने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजप्रताप यादव यांचा पक्ष जनशक्ति जनता दलने (जेजेडी) रालोआ सरकारला नैतिक समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

18 मंत्री शपथ घेणार
नितीश कुमार यांच्यासोबत 18 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्यांमध्ये भाजपकडून सम्राट चौधरी, रामकृपाल यादव आणि मंगल पांडे यांचा समावेश आहे. चिराग पासवान यांचा पक्ष, लोजपा (आर) बिहार सरकारमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
यावेळी मंत्रिमंडळात 30-32 मंत्री असू शकतात. जेडीयू आणि भाजपकडे समान संख्या असू शकते.