खोर्ली, जुने गोवे येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळ काल सकाळी 6.45 च्या सुमारास एका कारने (क्र. जीए-07-एन-1800) धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला.
मनोज काणकोणकर (वय 39 वर्षे, रा. खोर्ली) असे मृत पादचाऱ्याचे नावे आहे. कारचालकाच्या विरोधात बेशिस्तपणे वाहन चालविल्या प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सदर कार पणजी येथून बाणस्तारीच्या दिशेने जात होती. खोर्ली येथे रेल्वे उड्डाण पुलाजवळ कारने पादचारी मनोज काणकोणकर यांना जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना जखमी त्यांचे निधन झाले. या प्रकरणी जुने गोवे पोलीस तपास करीत आहेत.