
पावसाने बाधित झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २६ धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम ङ्गलंदाजी करताना ५० षटकात ७ बाद २८१ धावांपर्यंत मजल मारत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान ठेवले. मात्र पावसाच्या व्यत्ययानंतर कांगारूंसमोर २१ षटकांत १६४ धावांचे आव्हान देण्यात आले. मात्र त्यांचा संपूर्ण संघ ९ बाद १३७ धावाच करू शकला.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. बुमराहने हिल्टन कार्टराईटला १ धावांवर बाद करत पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला. या धक्क्यातून पाहुणा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार ठोकत सामन्यामध्ये काही वेळासाठी रंगत निर्माण केली. ङ्गॉल्कनरने नाबाद राहत ३२ धावा केल्या. भारताकडून युजवेंद्र चहलने ३, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ आणि भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, नाणेङ्गेकीचा कौल जिंकत कोहलीने ङ्गलंदाजीचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने ङ्गक्त ११ धावांची सलामी दिली. रहाणे ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि मनीष पांडेने उपस्थित प्रेक्षकांची निराशा केली. नॅथन कुल्टर-नाईलने कोहलीला मॅक्सवेलच्या हाती शून्यावर बाद करत भारताला मोठा धक्का दिला. त्यानंतर पुढच्यात षटकात नाईलने मनीष पांडेला शून्यावर माघारी धाडत भारताची अवस्था ३ बाद ११ अशी केली. संघ संकटात असताना रोहितकडून जबाबदार खेळीची अपेक्षा होती. परंतु, स्टोईनिसचा चेंडू हूक करण्याच्या नादात सीमारेषेवर झेल देऊन त्याने तंबूची वाट धरली. यावेळी संघाची धावसंख्या ४ बाद ६४ अशी होती. रोहित बाद झाल्यानंतर धोनीने मैदानात पाऊल ठेवले, केदार जाधव आणि धोनीमध्ये चांगली भागीदारी होणार असे वाटत असताना जाधव बाद झाला. त्याने ४० धावांचे योगदान दिले. भारताचा डाव अकाली संपणार असे वाटत असताना पंड्याने धोनीसह १९.२ षटकांत ११८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत पंड्याचा वाटा ८३ धावांचा होता. ४५ चेंडूंत ३५ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर पंड्याने पुढील २१ चेडूंत २२८.५७च्या सरासरीने धावा कुटल्या. पंड्याने केवळ ६६ चेंडूंत ८३ धावांची झंझावाती खेळी साकारली.
पंड्या बाद झाल्यानंतर धोनीने भुवनेश्वरला सोबत घेत किल्ला लढवला. अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि भुवीने जोरदार ङ्गटकेबाजी केली. धोनीने ८८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ७९ धावा केल्या. भुवनेश्वर ३२ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कुल्टर-नाईलने १० षटकांत ४४ धावा देत ३ बळी मिळवले. स्टोईनिसने दोन बळी मिळवले, तर ङ्गॉल्कनर आणि झंपाने प्रत्येकी एक बळी मिळवला.
धोनीचे अर्धशतकांचे शतक
माजी कर्णधार एम. एस. धोनीने आणखी एक विक्रम केला आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांचे शतक साजरे केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांचे शतक पूर्ण करणारा धोनी भारताचा चौथा खेळाडू आहे. धोनीने एकदिवसीय सामन्यात ६६, कसोटीमध्ये ३३ आणि टी-२०मध्ये एक अर्धशतक झळकावले आहे.