छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधातील चकमकीत काल सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या नक्षलवाद्यांकडून एक स्वयंचलित शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. माओवादी संघटनेच्या नक्षलवादी सदर ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही शोधमोहीम सुरू झाली. यादरम्यान सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये अनेक वेळा गोळीबार झाला. चकमकीच्या ठिकाणी हत्यारे सापडली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमधील एकाची ओळख पटली आहे. तो पेद्रास येथील स्थानिक संघटनेचा कमांडर आहे. त्याच्यावर 5 लाखांचे बक्षीस होते. महिला नक्षलवाद्याची ओळख अजूनही पटलेली नाही. या चकमकीनंतर सुरक्षा दलांना हत्यारे सापडली आहे. यामध्ये एक इन्सास रायफल, एक 12 बोर रायफल, तसेच इतर शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.