युक्रेनकडून रशियाची 40 लढाऊ विमाने उद्ध्वस्त

0
9

>> द्रोन हल्ल्यांद्वारे विविध हवाईतळांना केले लक्ष्य

मागील 3 वर्षाहून अधिक काळ रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असून, आता या युद्धाने नवे वळण घेतले आहे. युक्रेनने काल रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. युक्रेनने द्रोन हल्ल्याद्वारे रशियाच्या विविध हवाईतळांना लक्ष्य केले. त्यात 40 हून अधिक रशियन लढाऊ विमाने उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे. रशियन सैन्य तळांवर झालेल्या या हल्ल्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत धावपट्टीवर उभी विमाने आगीच्या विळख्यात सापडून धूर उठत असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओत हवेत उडणारा द्रोनही नजरेस येत आहे. त्यातून आग आणि धूर दिसत आहे.

युक्रेनने ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ द्वारे रशियात हा मोठा हल्ला केला त्यात रशियाच्या लांबच्या मारक क्षमतेतील विमानांना टार्गेट करण्यात आले. युक्रेनने रशियाच्या सायबेरियातील हवाई तळावर तैनात 40 लढाऊ बॉम्बर विमानांवर हल्ला केला.
युक्रेनने त्यांच्या सीमेपासून 4700 किलोमीटर आत घुसून रशियाच्या बेलाया हवाईतळ, 2000 किमी अंतरावरील ओलेन्या, 700 किमी आत ड्यागिलेवो आणि 900 किमी दूर असलेल्या ल्वानोवो हवाईतळावर द्रोन हल्ला केला. युक्रेनने रशियातील या ड्रोन हल्ल्याला ऑपरेशन स्पायडरवेब असे नाव दिले. ज्यात रशियाच्या टीयू 95, टीयू 22 एम 3 एअरक्राफ्टसह ए 50 हवाई वॉनिंग एअरक्राफ्टवरही हल्ला केला. ही विमाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यासाठी वापरण्यात आली होती. युक्रेनने रशियाच्या ज्या विमानांवर हल्ला केला त्याची किंमत जवळपास 2 बिलियन डॉलर म्हणजे 200 कोटी डॉलर
इतकी होती.