धर्मपुरी – बंगळूर येथे झालेल्या अपघातात चोपडे येथील डॉम्निक डिसोझा (३३) या विवाहित युवकाचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी शर्ली गंभीर तर मित्र विलट किरकोळ जखमी झाले. या अपघातात त्यांचा तीन वर्षांचा मुलगा आश्चर्यकारकरीत्या बचावला. डॉम्निक वेलंकनी येथे देवदर्शनासाठी जाताना ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांच्या कारला अपघात झाला. रस्त्यावर अचानक आलेल्या दुचाकीस्वाराला चुकवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्यावर पलटून डॉम्निक याचे निधन झाले. पत्नीवर बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. मयत डॉम्निक याचा मृतदेह काल बांबोळी येथे आणण्यात आला. आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.