पाटो पूल आजपासून 14 एप्रिलपर्यंत बंद

0
13

पणजी शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी वापरला जाणारा पाटो पूल शुक्रवार दि. 11 एप्रिल ते सोमवार दि. 14 एप्रिल या काळात दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पाटो पूल बंदच्या काळात या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाणार आहे. नदी शेजारील पाटो पुलावरून दोन्ही बाजूंनी वाहनाच्या वाहतुकीस मान्यता दिली जाणार आहे. तसेच जुन्या पाटो पुलाचा शहरात प्रवेश करण्यासाठी वापर करण्यास मान्यता दिली जाणार आहे.